11 Lesser Known Facts About Sindhudurg

निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा, मोठ्या काळजांच्या माणसांचा जिल्हा म्हणुन आपला सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. इथलं पर्यटन, रुढी-परंपरा, साधेपणा, खाद्यसंस्कृती, इतिहास अशा कितीतरी गोष्टींचं आकर्षण संपुर्ण जगाला लागलेलं असतं. चला तर, आज आपण पाहुया सिंधुदुर्गाविषयीच्या अशाच काही मनोरंजक व आश्चर्यकारक गोष्टी ज्या जगालाच काय, अगदी गाववाल्यालादेखील फारशा माहीत नसतात.

निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा, मोठ्या काळजांच्या माणसांचा जिल्हा म्हणुन आपला सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. इथलं पर्यटन, रुढी-परंपरा, साधेपणा, खाद्यसंस्कृती, इतिहास अशा कितीतरी गोष्टींचं आकर्षण संपुर्ण जगाला लागलेलं असतं. चला तर, आज आपण पाहुया सिंधुदुर्गाविषयीच्या अशाच काही मनोरंजक व आश्चर्यकारक गोष्टी ज्या जगालाच काय, अगदी गाववाल्यालादेखील फारशा माहीत नसतात.


#1. धामापुर तलाव
Photo

सिंधुदुर्गातील सर्वात मोठा तलाव असलेला हा धामापुरचा तलाव भगवती मंदीराच्या नजीकच वसला आहे. हा तलाव 1530 साली नागेश देसाई या वतनदाराने बांधला होता.


#2. रेडीचा गणपती
Photo

18 एप्रिल 1976 रोजी सदानंद कांबळी नावाच्या ट्रक ड्रायव्हरला श्री गजाननाने दृष्टांत दिला. त्या दृष्टांतानुसार गावकऱ्यांनी जमीन खोदण्यास प्रारंभ केला. त्यानंतर दोनच दिवसांनी ही मुर्ती बाहेर काढली गेली.


#3. हेलियम वायुचा शोध
Photo

असे म्हटले जाते की 18 ऑगस्ट 1868 या दिवशी, सर जोसेफ नॉर्मन लॉक्यरयांनी विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम या वायुचा शोध लावला. 2008 पासुन या किल्ल्यावर ‘जागतिक हेलियम दिवस’ देखील साजरा केला जातो.


#4. कुणकेश्वर मंदिर आणी मुस्लिम व्यापारी

Photo

आख्यायिकेनुसार एक मुस्लिम खलाशी व्यापारासाठी समुद्रात प्रवास करीत होता. त्यावेळी वादळाची चाहूल लागताच त्याने किनाऱ्यावरील दिव्याकडे प्रार्थना केली व संकट दुर केल्यास मंदिर बांधीन असा नवस केला. कालांतराने वादळ शमले व तो सुखरूप किनाऱ्यावर आला. नवस केल्याप्रमाणे त्याने त्याठिकाणी भव्य मंदिर उभारले. मात्र त्याच्या या कृत्याने त्याला त्याचे स्वधर्मीय त्याला स्वीकारणार नाहीत, अशी त्याची भावना झाली. म्हणुन त्याने याच मंदिरावरून उडी मारून आपले जीवन संपविले.


#5. शहीद विजय साळसकर
Photo

2008 सालच्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर हे मुळ वैभववाडी येथील आहेत. साळसकर यांनी पोलिस दलात पंचवीस वर्षे सेवा बजावली.


#6. जिमखाना आणी तेंडुलकर
Photo

सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरील प्रदर्शनीय सामन्यात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, राहुल द्रविड, संजय मांजरेकर इत्यादी खेळाडुंनी सहभाग घेतला होता.


#7. उपरलकर देवस्थान
Photo

प्राचीन काळी उपरलकर देवस्थानाकडे 365 खेड्यांतुन प्रत्येकी एक बकरा किंवा कोंबड्याचा सांगाडा, एक नारळ, एक पानाचा विडा असे घेऊन खेड्यातून वाजत गाजत त्यावेळचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडळी येत. हे देवकार्य पुर्ण करण्यासाठी राजाच्या उपस्थितीत हा सोहळा होई. मात्र त्यावेळच्या महाराज बापुसाहेबांनी ही प्रथा बंद केली.


#8. पर्यटन जिल्हा
Photo

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्याची 30 एप्रिल 1997मध्ये घोषणा झाली.


#9. वि.स.खांडेकर
Vi_Sa_Khandekar copyप्रसिद्ध साहित्यकार वि.स.खांडेकर हे वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गावी शिक्षक म्हणुन सेवा बजावत होते. 1968 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देवुन गौरविले. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी त्यांना 1974 साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.


#10. छत्रपती शिवरायांच्या पायाचे ठसे
Thase jpgB_MwEiECQAAhWGH

मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचे व उजव्या हाताचे ठसे आहेत. तसेच या किल्ल्यावर शिवरायांचे मंदिरदेखील आहे.


#11. निखिल नाईक
Naik 11156114_664462160320523_7889457051977617645_n copy

आयपीएलच्या आठव्या मोसमासाठी किंग्ज ईलेव्हन पंजाब संघाने सावंतवाडीतील निखिल नाईक याला तीस लाख रूपयांना करारबद्ध केले होते.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते खाली नक्की कमेंट करा आणी हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका!