सावंतवाडीच्या निखिल नाईकचा प्रेरणादायी प्रवास…

“महाराष्ट्राच्या १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील संघांना उच्चशिखरावर नेल्यानंतर निखिलने विजय हजारेे चषकामधून २०१४ साली प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
या स्पर्धेत निखिलने ५८.५० च्या सरासरीने ५ सामन्यांत २३४ धावा झळकावून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं.”

Advertisements

कोकणासारख्या भागात जन्माला येऊन सुद्धा जिद्दीच्या बळावर जग जिंकता येते हे आपण अनेकदा पाहीले आहे. यामध्ये अलिकडचेच उदाहरण म्हणजे आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन संघाचा खेळाडू आणि सिंधुदुर्गचा सुपुत्र निखिल नाईक.
image

यष्टीरक्षक-फलंदाज असणाऱ्या निखिलचा हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. २०१० साली निखिलने त्याची आई गमावली. मासेविक्रेते असणाऱ्या निखिलच्या वडिलांना त्याच्या या प्रवासासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले.

11027464_654678021298937_2687439255377728059_n
महाराष्ट्राच्या १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील संघांना उच्चशिखरावर नेल्यानंतर निखिलने विजय हजारेे चषकामधून २०१४ साली प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
या स्पर्धेत निखिलने ५८.५० च्या सरासरीने ५ सामन्यांत २३४ धावा झळकावून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं.
image

निखिलची आक्रमक फलंदाजीच्या शैलीमुळे २०१५ साली मुंबई इंडियन्स संघाने निखिलला करारबद्ध करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र हा करार पूर्ण होऊ शकला नाही. अखेरीस २०१५ साली किंग्स इलेव्हन पंजाब या प्रीती झिंटाच्या संघाने निखिलला ३० लाख रुपयांना करारबद्ध केले. मात्र संपूर्ण स्पर्धेत निखिलला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही.
10731072_691235697643169_6629342787786042187_n

त्यानंतर झालेल्या २० षटकांच्या सय्यद मुश्ताक करंडक स्पर्धेत निखिलने ५ सामन्यांत १९६ धावा झळकावल्या. त्यामुळे पंजाब संघाने २०१६च्या आयपीएल स्पर्धेसाठी निखिलला पुन्हा आपल्या संघात कायम ठेवले. अखेरीस यंदाच्या स्पर्धेत निखिलला अंतिम संघात स्थान मिळाले. निखिल नाईकला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन वेळा अंतिम संघात स्थान देण्यात आलं. निखिलची हि कारकीर्द अशीच बहरू दे यासाठी ‘आता सिंधुदुर्ग पण ऑनलाईन’ परिवाराकडून निखिलला खूप खूप शुभेच्छा!!!☺

निखिल नाईक याची यंदाच्या स्पर्धेतील काही छायाचित्रे

47695

47734

 

47721

 

13076562_795544513909639_214866189643353006_n
Photo : iplt20.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s