ट्विटरवर रंगतोय मराठी साहित्य संमेलनाचा मेळा!

एकीकडे मराठी भाषा संकटात आहे अशी ओरड होत असतानाच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातोय. आजच्या इंटरनेटच्या युगात मराठी भाषा संवर्धनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मायक्रोब्लॉगिंग साईट म्हणुन प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवरदेखील मराठी भाषा जतन करण्यासाठी कायम विविध प्रयोग राबविले जातात. मराठी रिट्विट,मराठी वर्ड,मराठी ब्रेन यांसारखी मराठीसाठी कार्य करणारी अनेक ट्विटर अकाऊंट्स जुने मराठी शब्द वापरात आणणे, मराठी सामान्य ज्ञान, मराठी ट्विट्सचा प्रसार यांसाठी कार्यरत आहेत. ट्विटरचा मराठीतुन वापर करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अलीकडच्या काळात ,“#मराठीदिन”, “#महाराष्ट्रदिन”, “#वांद्रेकोणाचे” यांसारखे अनेक हॅशटॅग्स संपुर्ण भारतात ट्रेंड झाले होते.

मराठी भाषेच्या संवर्धनाचे पुढचे पाऊल म्हणजे पहिलेवहिले ट्विटर संमेलन

Photo

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे १५ ते १८ जानेवारी ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. याच कालावधीत ट्विटरवरच्या पहिल्या मराठी संमेलनाचे आयोजन मराठी वर्ड या ट्विटर हँडलने केले आहे. ट्विटर संमेलनाच्या निमित्ताने मराठीमध्ये ट्विट करणाऱ्यांची संख्या वाढावी व त्याद्वारे मराठी भाषेचा प्रसार व्हावा हे या ट्विटर संमेलनाचे उद्दिष्ट्य आहे. या संमेलनामध्ये #ट्विटरसंमेलन हा मुख्य हॅशटॅग असुन विभागवार इतर हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत.

Photo
(फोटो: @MarathiWord )

ट्विटर संमेलनासाठी स्वतंत्र युट्युब चॅनेल
या पहिल्या ट्विटर संमेलनाची उत्सुकता ट्विटरवर वाढत असुन प्रत्येकजण या संमेलनामध्ये आपले योगदान देत आहे.
याचाच एक भाग म्हणुन ई-बुक प्रकाशक शैलेश खडतरे यांनी या संमेलनासाठी स्वतंत्र चॅनेल सुरू केले आहे.

Photo
(फोटो: @Shailesh_Eboo )

या संमेलनामध्ये भाग घेऊन विविध युवा कवी, लेखकांना आपले कलागुण जगासमोर मांडता येतील.

ट्विटर संमेलनाची महाराष्ट्र टाईम्स व शिक्षणमंत्री विनोद तावडेंकडून दखल
ट्विटरवर होणाऱ्या या मराठी संमेलनाची दखल महाराष्ट्र टाईम्स या अग्रगण्य वर्तमानपत्रानेदेखिल घेतली आहे. हा लेख इथे वाचता येईल.

त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत:

तर, आहात ना तयार या अनोख्या संमेलनात भाग घ्यायला? मराठी वर्ड या हँडलला फॉलो करा व तुमच्या ट्विटमध्ये #ट्विटरसंमेलन हा हॅशटॅग वापरून लिहायला सुरू करा!

आपल्या खास मालवणी भाषेतील ट्विट्स वाचण्यासाठी फॉलो करा तात्या सरपंच, बॉब्बी मालवणकर, मुंबईचो मालवणी यांना!

Advertisements