सावंतवाडी पर्यटन महोत्सव 2015 ची रूपरेषा जाहीर

23 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला सावंतवाडी पर्यटन महोत्सव 2015 या महोत्सवाची रूपरेषा अखेर जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांमधुन महोत्सवाचे वैविध्य जपण्याचा प्रयत्न यंदादेखील करण्यात आला आहे. यंदाच्या सावंतवाडी पर्यटन महोत्सवामध्ये ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, विनित बोंडे, दिगंबर नाईक त्याचप्रमाणे ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमधील प्राजक्ता माळी, अक्षता सावंत यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा गर्दीचे सर्व रेकॉर्डस मोडीत येण्याची शक्यता आहे.

Photo

कार्यक्रमांची रुपरेषा

बुधवार 23 डिसेंबर
*सायंकाळी 6 वाजता नगरपरिषदेच्या बोट क्लबकडे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण आणि मोती तलावातील तरंगत्या शोभायात्रेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन, सोबत चपई नृत्य, पालखी नृत्य, ढोलपथक, आतषबाजी
* सायंकाळी 7 ते 7.30 ओडिसी शास्त्रीय नृत्य – गंगातरंग व दशावतार आणि पुणेरी दर्जेदार लावण्यांचा कार्यक्रम
*संध्याकाळी 7.30 ते 8.30 वा. कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर पर्यटन महोत्सवाचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
*रात्री 8.30 वाजता पूजा पूनम प्रस्तुत सुपरहिट लावण्यांचा बहारदार कार्यक्रम ‘या रावजी बसा भावजी’.

गुरुवार 24 डिसेंबर
* सायं. 6 ते 7.30 विविध सांस्कृतिक स्पर्धांमधील स्थानिक विजेत्यांचे कार्यक्रम
* सायं. 7.30 ते रात्री 10 वा. भावगीते, भक्तीसंगीत व नाटय़संगीतावर आधारित प्रसिद्ध तबलावादक साई बँकर्स पुणे प्रस्तुत ‘भावभक्ती सरगम’, सहभाग – ‘सारेगम’विजेते नचिकेत देसाई, सुवर्णा घैसास व इतर.

शुक्रवार 25 डिसेंबर
*सायं. 6 ते 7 वा. पद्मकोष कथ्थक पुणे प्रस्तुत आंतरराष्ट्रीय कथ्थक नृत्यांगना सोनल पाटील व सहकारी यांचा कार्यक्रम
*सायंकाळी 7 ते रात्री 9 स्वरनिनाद प्रस्तुत ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ मराठी, हिंदी गीतांचा नृत्याविष्कारासह बहारदार नजराणा
*रात्री 9 ते रात्री 12 पर्यंत म्युझिक मेलोडीज – विश्वजीत बोरवणकर, कीर्ती किल्लेकर, रसिका जानू, जयदीप भगवडकर इ. कलाकारांचा कार्यक्रम.

शनिवार 26 डिसेंबर
*सायंकाळी 6 ते 7 दत्तप्रसाद महिला मंडळ भटवाडी
प्रस्तुत फुगडीचा कार्यक्रम, सायं
*7 ते रात्री 9 वा. तियात्र – आमचा विश्वास
*रात्री 9 ते रात्री 12 वा. आर्केस्ट्रा स्वरबहार, मुंबई तसेच कलाकारांचे कार्यक्रम.

रविवार दि. 27 डिसेंबर
*सायं. 6.30 ते 8.30 महाराष्ट्राची लोककला – लोकनृत्यावर आधारित कार्यक्रम
*सायंकाळी 9 ते रात्री 12 यावेळेत ‘आई’ प्रस्तुत ‘जल्लोष 2015’ ‘चला हवा येऊ द्या’फेम भाऊ कदम, विनित बोंडे, प्राजक्ता माळी, अक्षता सावंत, दिगंबर नाईक व इतर 25 नृत्यकलाकारांचा बहारदार कार्यक्रम.
तर मग, येताय ना महोत्सवाला?

Advertisements