“धामापुरचा तलाव”

मालवण तालुक्यात वसलेले निसर्गसौदर्याने भरभरून वाहणारे टुमदार गाव धामापुर. याच धामापुर गावात वसलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव, ‘धामापुरचा तलाव’.

Photo
Photo : DhamapurFacebook Page

मालवण-कुडाळ मार्गावर दुतर्फा डोंगराच्यामध्ये हा तलाव सुमारे 5 एकर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला आहे. सोळाव्या शतकात 1530 साली विजयनगर साम्राज्याचे वतनदार नागेश देसाई यांनी हा तलाव बांधला. एका बंधाऱ्यामुळे हा जलाशय निर्माण झाला असे म्हटले जाते.

Photo

या तलावाच्या नजीकच धामापुर गावाची रक्षणकर्ती श्री देवी भगवतीचे प्राचीन देवालय आहे. हे मंदीर कौलारू आहे व त्याचा गाभारा दगडी आहे.

Photo
Photo : DhamapurFacebook Page

Photo
Photography by Vibha Ravi from blog PixelVoyages

Photo
Photography by Vibha Ravi from blog PixelVoyages

या मंदिरामध्ये श्री भगवती देवीची 4 फुट उंच सुबक मुर्ती आहे.

Photo

Photo : Dhamapur Facebook Page

या धामापुरच्या तलावाविषयी एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. पुर्वीच्या काळी एखाद्याला लग्नसमारंभासारख्या कार्यासाठी दागिने हवे असल्यास त्याने या तलावाच्या काठी फुलांची एक परडी घेवुन यावे व हव्या असलेल्या दागिन्यांची नावे घेऊन ती परडी पाण्यात सोडून द्यावी. ती परडी तलावाच्या मध्यभागी जावुन बुडत असे व थोड्या वेळातच त्या व्यक्तीने मागितलेले दागिने घेऊन वर येत असे. ते दागिने घेताना नमस्कार करून ते परत केव्हा करणार हे देवीला सांगावे लागत असे. मात्र दोन व्यक्तींनी मोहात पडून घेतलेले दागिने परत केलेच नाही. तेव्हापासुन देवीचा कोप झाला आणी दागिने मिळणेच बंद झाले.
निसर्गसौदर्यामुळे धामापुरचा तलाव हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणुन उदयास आले आहे.

Photo

या ठिकाणी जंगलसफारीसाठी चिरेबंदी पायवाटा, निसर्गवाचन केंद्र, पक्षीनिरीक्षणासाठी एक चाळीस फुट उंच मनोरा आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी याठिकाणी बोटींगची सुविधा, तंबु निवास, बालोद्यान इत्यादी सुविधादेखील आहेत.

Photo

हा सुंदर अनुभव घेण्यासाठी एकदा धामापुरकडे पावले नक्की वळवा! हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका! :)

Advertisements