मालवणी बोलीभाषेतील पहिला चित्रपट “भिकू” प्रदर्शित

मालवणी बोलीभाषेच्या संवर्धनाच्या व विकासाच्या चळवळीमध्ये नुकतंच मोठं पाऊल टाकलं आहे ते कणकवलीच्या तरूणाईने! मच्छिंद्र कांबळींनी संपुर्ण महाराष्ट्राला मालवणी भाषेची गोडी दाखवल्यानंतर आता पुन्हा एकदा आपली मालवणी भाषा मोठ्या पडद्यावर येतेय. आणी ही किमया साधलीय कणकवलीच्या युवकांनी.
Photo

या तरूणांनी कमी खर्चामध्ये “भिकू” हा मालवणी भाषेमधील चित्रपट बनवुन तो प्रदर्शित देखील केला आहे. 12 डिसेंबरला कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दोन्ही प्रयोग “हाऊसफुल्ल” झाले होते. “भिकू” हा पुर्णपणे मालवणी बोलीभाषेत असणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
Photo

शशिकांत कांबळी, प्रितेश कामत, मितेश चिंदरकर, विरेन वालावलकर यांनी बनवलेल्या या चित्रपटामध्ये दिग्दर्शन, अभिनय ते छायांकन अशा सर्व बाजु इथल्या स्थानिकांनीच सांभाळल्या आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकांत कांबळी यांनी केले असुन प्रितेश-मितेश यांनी संगीत दिले आहे. तसेच या चित्रपटाचे गीतलेखन प्रीती बावकर व मितेश-प्रितेश यांनी केले आहे. “भिकू” चित्रपटाचे छायांकन अॅंड्रयु फर्नांडिस व श्याम सामंत यांनी सांभाळले आहे.
Photo

या चित्रपटाचे कला दिग्दर्शन रवीकिरण शिरवलकर, सिद्धेश शिरवलकर, सिद्धेश मांडवकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे शुटिंग कणकवली शहर, बांदिवडे, सोनवडे, शिवडाव, जांभवडे, कनेडी, डिगस, पोखरण, हरकुळ या ठिकाणी झाले आहे.

“भिकू” चित्रपटाचा ट्रेलर:

युट्युबवर जाऊन हा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टिम “भिकू”चे ‘आता सिंधुदुर्ग पण ऑनलाइन’ कडून अभिनंदन आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! :)

Advertisements