स्वयंभु द्विभुज श्री गणेश मंदिर, रेडी

caption
(Source: Prakash Manjrekar)

रेडी येथील स्वयंभु द्विभुज श्री गणेश मंदिर संपुर्ण राज्यात ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणुन प्रसिद्ध आहे. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.
18 एप्रिल 1976 रोजी रेडी येथील खाणीत सदानंद कांबळी नावाचे एक गृहस्थ ट्रक ड्रायव्हर म्हणुन कामास आले होते. रात्रपाळीचे काम संपल्यावर त्यांनी आपला ट्रक डोंगरावर लावला. परंतु थोड्या वेळाने तो ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न करताच तो सुरू होईना. खुप प्रयत्न करून अखेरीस ते आपल्या ट्रकमध्येच झोपले. त्या रात्री श्री गजानाने त्यांना दृष्टांत दिला की, ‘मी येथे आहे. मला बाहेर काढ.
भयभीत झालेल्या कांबळी यांनी झाला प्रकार गावकर्यांना सांगावा म्हणुन ट्रक चालु करायचा प्रयत्न केला आणी आता तो लगेचच चालु झाला. गावातल्या लोकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी रेडीचे ग्रामदैवत श्री माऊलीला कौल लावला. तेव्हा ‘मूर्ती दिसेपर्यंत खोदा’ असा कौल मिळाला.

[वाचा:सावंतवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळे]

खोदण्यास सुरूवात केल्यानंतर दोनच दिवसांनी मूर्तीचा तोंडाकडचा व कानाकडचा भाग दिसु लागला. 1 मे 1976 या दिवशी, म्हणजे बारा दिवसांनी संपुर्ण मूर्ती खोदुन बाहेर काढण्यात आली.
अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असुन एक पाय दुमडलेल्या अवस्थेत आहे. या मूर्तीचा एक हात आशीर्वाद मुद्रेत असुन दुसर्या हातात मोदक आहे. या मूर्तीसमोर खोदकामात सव्वा महिन्यांनी सापडलेला भलामोठा उंदीर देखील आहे.

Advertisements