सावंतवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चार चाँद लावण्यात महत्त्वाची भुमिका बजावतोय तो म्हणजे सावंतवाडी तालुका.
सावंतवाडी शहर व इतर गावे निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. आम्ही निवडलीयत यातलीच काही निवडक स्थळे!

1. मध्यवर्ती शहर व बाजारपेठ:
Moti Talao

सावंतवाडी शहराच्या मधोमध सुंदर मोती तलाव आहे. संध्याकाळच्या सुंदर रोषणाईत हा तलाव आणखीच खुलुन दिसतो. संस्थानाच्या काळात 1874 मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील 31 एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. चारी बाजुंनी भक्कम दगडांनी बांधकाम करण्यात आले. पाणी ठेवण्यासाठी मुशी ठेवण्यात आल्या. अशाप्रकारे मोती तलावाची निर्मिती झाली. त्याचबरोबर लगतच्या बाजारपेठेलाही भेट देऊन वेळ घालवता येतो.
Toys
सावंतवाडीची लाकडी खेळणी प्रसिद्ध असुन त्या खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडते.

2. आंबोली:
Amboli
सावंतवाडीपासुन जवळच आंबोली हे पर्यटनासाठी प्रसिद्ध गाव आहे. आंबोलीतील धबधबे, हिरण्यकेशी मंदीर, सनसेट पॉईंट प्रसिद्ध आहेत. आंबोलीला ‘गरीबांचे महाबळेश्वर’ असे देखील म्हटले जाते.

(वाचा: “गारेगार आंबोली”)

3. सावंतवाडी संस्थान:
Palace
सावंतवाडी शहराचा मानबिंदु म्हणुन हा संस्थानकालीन राजवाडा गेल्या तीनशे वर्षांपासुन उभा आहे. या राजवाड्यात पुर्वी संस्थानाचा कारभार चालायचा. आता या राजवाड्याचा कारभार संस्थानाच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले पाहत आहेत.
या भव्यदिव्य राजवाड्यात सर्व राजांचे फोटो, गंजिफासारख्या हस्तकलांची स्थळे आहेत.

4.नरेंद्र वनोद्यान:
सावंतवाडी शहरात समुद्रसपाटीपासुन 300 मीटर उंचीवर निसर्दसौंदर्याने नटलेले नरेंद्र वनोद्यान वसले आहे. या डोंगरावरून वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यापर्यंतचा परीसर नजरेस पडतो. या डोंगरावर लहानमोठे धबधबे, संस्थानकालीन विहीरी, तसेच प्राचीन मारूती मंदिरदेखील आहे.

(वाचा: मालवणात येऊन आनंद लुटलाच पाहीजे अशा टॉप 5गोष्टी )

5. जगन्नाथराव भोसले उद्यान:
शहराच्या मध्यभागीच हे सुंदर उद्यान आहे. विरंगुळ्यासाठी येथे लहानथोरांची कायमच गर्दी असते. सुंदर रचना, विविध झाडं, खेळण्यांचा आनंद घेण्यासाठी या उद्यानात एखादा फेरफटका नक्की मारावा.

याशिवाय सावंतवाडीतली तुमची आवडती ठिकाणं कोणती ते खाली नक्की कॉमेंट करा आणी हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. :)

Advertisements

8 thoughts on “सावंतवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळे

  1. सावंतवाडी संस्थानचे राजे पंचम खेम सावंत पहीले यांचे योगगुरू श्री.राजाधिराज महंत सदगुरू परशुराम भारती महाराज श्रीक्षेत्र तळवणे मठ ,
    सावंतवाडी तालुक्यातील एक गावं तळवणे या ठीकाणी श्री.राजाधिराज महंत सदगुरू परशुराम भारती महाराज यांनी सन 1640 मध्ये जिवत समाधी घेतली आहे. त्याच ठिकाणी त्यांचा मठ आहे. पर्यटन व अध्यात्माच्या दृष्टीने हे एक सावंतवाडी तालुक्यातील महत्वपुर्ण स्थळ आहे.एकदातरी या ठीकाणी भेट देवून बघा.

    Like

  2. हिरण्य्केशी मंदिराचे फोटो लोड का केले नाही. आणि इतिहास देखिल?

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s