“गारेगार” आंबोली…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे महत्तवाच्या आकर्षणांपैकी एक म्हणजे आंबोली.

ALT
आंबोली धबधबा

निसर्गाने नटलेले हे गाव 2368 फुटांवर वसले असल्यामुळे या गावात बारमाही थंड वातावरण असते. इथल्या निसर्गसौंदर्याबरोबरच पावसाळ्यात वाहणारे धबधबे, संध्याकाळचा सुंदर सुर्यास्ताचा क्षण यांमुळे आंबोली सफर कायम एक वेगळा आनंद देऊन जाते. आणी या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठीच दरवर्षी पर्यटकांची पावले आंबोलीकडे मोठ्या संख्येने वळतात.
आंबोली हे गाव सावंतवाडी शहरापासुन 35 किमी, सावंतवाडी रेल्वे स्थानकापासुन 40 किमी, बेळगावपासुन 70, कोल्हापुरपासुन 135 तर पणजी शहरापासुन शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे. धबधबे, सनसेट पॉईंट यांच्याबरोबरच आंबोलीमध्ये वनखात्याचे उद्यान, महादेवगड, हिरण्यकेशी अशी पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे आहेत.
आंबोलीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतानाच वन्यप्राण्यांच्या दर्शनाने सफर रोमांचक बनते. आंबोलीत माकडांबरोबरच सांबर, शेकरू, सरपटणारे प्राणी, दुर्मिळ बेडूक व विविध पक्षी दिसतात. त्यामुळे आंबोलीमध्ये विविध संशोधक व संस्था आपले कार्य करत असतात. आज आंबोलीला वर्षभरात दीड लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. यामध्ये स्थानिक पर्यटकांबरोबरच देशविदेशातील पर्यटकांचा समावेश असतो.

Advertisements