मालवणात येऊन आनंद लुटलाच पाहीजे अशा टॉप 5 गोष्टी

सिंधुदुर्गाचे पर्यटनविश्व मालवणचा आनंद लुटल्याशिवाय अपुर्ण आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले मालवण देशविदेशातल्या पर्यटकांना कायमच भुरळ घालत आलं आहे. मालवणातले समुद्र किनारे, किल्ले, मंदीरे, ऐतिहासिक वास्तु या सर्वांनी मालवण न्हाऊन निघाले आहेत. पर्यटकांनी या सगळ्यांचा आनंद लुटावाच मात्र मालवणात आल्यावर खालील पाच गोष्टींचा आनंद न चुकता घ्यावा:

#1 सिंधुदुर्ग किल्ला:

सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदुर्ग किल्ला

मालवणचे आणी एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदु म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात कुरटे बेटावर बांधला आहे. या किल्ल्यावर शिवरायांचे एकमेव मंदीर आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्यांची सोय आहे.

#2 तारकर्ली बीच

उघड्या डोळ्यांनी जर निसर्गरम्य समुद्रकिनारा बघायचा असेल तर ‘तारकर्लीत येवकच व्हया.’ तारकर्लीचा लांबच लांबच सुंदर बीचवर पर्यटनाचा आनंद लुटताना कोकणात आल्याचा खरा आनंद मिळतो.

#3 तारकर्ली बीचवरील साहसी खेळ:

तारकर्ली बीचला भेट देऊन तेथील श्वास रोखुन धरणार्या साहसी खेळांचा आनंद न लुटता घरी परतणं, हे जरा मनाला पटतच नाही. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने इथल्या सर्फिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासॅलिंग इत्यादी साहसी खेळांचा आनंद लुटलाच पाहीजे.

#4 मालवणी जेवण:

मालवणच्या पर्यटनाचा आनंद लुटून तुम्ही दमला असाल आणी मोठ्याशा हॉटेलात जाऊन पिझ्झा-बर्गरवर ताव मारणार असाल तर तुमची पुर्ण ट्रीप फुकट गेली असं म्हणावं लागेल. मालवणात आल्यावर न चुकता इथल्या चमचमीत मालवणी भोजनाचा आस्वाद घ्या. इथले कोंबडी वडे, मच्छी कडी, मटन कडी तुमच्या सहलीचे चीज करतील. आणी या सगळ्यांनंतर एक ग्लास सोलकढी तो बनती है भिडू!

#5 मालवणचं ग्रामीण जीवन:

जर तुम्हाला खरोखरचं सिंधुदुर्गच्या आणी मालवणच्या सौंदर्याची अनुभुती घ्यायची असेल तर कुठलंही हॉटेल बुक न करता शहरापासुन जवळच्या गावात निवासाची सोय पाहा. तरच तुम्ही इथल्या निसर्गाचा, सौंदर्याचा, संस्कृतीचा आणी इथल्या माणसांचा आनंद घेवु शकता.

अर्थातच, या फक्त आम्ही निवडलेल्या टॉप 5 गोष्टी आहेत. पुरो मालवण बघुचो तर दोन म्हयन्यांची सुट्टी घेवन येवा…

Advertisements

2 thoughts on “मालवणात येऊन आनंद लुटलाच पाहीजे अशा टॉप 5 गोष्टी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s