बराक ओबामांचा सिंधुदुर्ग दौरा


सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराकभाऊ ओबामा आपल्या देशात ईलेत. तेंका वाटला, भारतात ईलव तसा जरा सिंधुदुर्ग बघुन येवया. तेंच्यानी आपला मनातला पटकरून मोदींका सांगल्यानी. पण मोदींका कासार्ड्याचो वाईट अनुभव असल्या कारणान मोदींनी तेंकाच मिशेल वैनींबरोबर जावक सांगल्यानी. ओबामाय ताच बघी होते.
तर अखेरीस ओबामांचो सिंधुदुर्ग दौरो ठरलो. तो पुढीलप्रमाणे:

8:00- विमानाने गोवा येथे आगमन; मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण
9:00- सावंतवाडी येथे आगमन
9:10- बापुसाहेब महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मोती तलावाभोवती फेरफटका
9:30- हॉटेल विजयमध्ये सामोसा-चहा नाष्ता
9:45- श्रीराम वाचन मंदीरमध्ये पत्रकार परिषद
10:00- कुडाळच्या दिशेने प्रयाण
10:13- झाराप बायपासजवळील नव्या पेट्रोलपंपाची पाहणी
10:25- कुडाळ येथे आगमन
10:30- एस.आर.एम कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन
10:50- कुडाळ बाजारपेठेतील रस्ते दुरूस्तीचे भुमीपुजन
11:00- ओरोसच्या दिशेने प्रयाण
11:20- ओरोस फाट्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन
11:30- ओरोस मुख्यालयाला भेट, जिल्हाधिकार्यांशी चर्चा
11:45- कणकवलीच्या दिशेने प्रयाण
12:15- कणकवलीत आगमन
12:30- हॉटेलमध्ये जेवण घेतील
12:50- ओसरगावच्या दिशेने प्रयाण
1:05- ओसरगावमध्ये महिला भवनला भेट देवुन पाहणी
1:20- दौरा आटोपुन ओबामा मुंबईच्या दिशेने रवाना

टीप: जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकारी आरोंदा जेटीसंदर्भात व्यस्त असल्याने कोणीही ओबामांच्या स्वागतासाठी उपस्थित नसतील.

Advertisements