प्रजासत्ताक दिन विशेष: स्मरण वीरपुत्र शुभम सावंतचे

‘जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’
आजच्या दिवशी लता दीदींचे हे बोल आठवण्याचं कारण म्हणजे माजगावचा वीरपुत्र शहीद शुभम सावंत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या हुडहुडी वादळात जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर ते सुस्थितीत आणण्यासाठी तैनात केलेल्या रेस्क्यू टीममधील नौदलाचा जवान असलेल्या शुभम सावंतला वीरमरण आले होते. शहीद शुभम सावंतवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंगा परिधान केलेल्या शुभमच्या पार्थिवाची अंतयात्रा गावातून काढण्यात आली. या अंतयात्रेमध्ये जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, शाळकरी मुले सहभागी झाली होती. साश्रुपूर्ण नयनांनी शुभमच्या वडिलांनी शुभमला अग्नी दिला तर, नौदलाच्या जवानांनी तीनवेळा आकाशात बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी दिली. या सलामीमध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक देखील सामील झाले होते.
शहीद शुभम सावंतला ‘आता सिंधुदुर्ग पण ऑनलाइन’कडुन सलाम! जय हिंद!

या अंत्ययात्रेची काही क्षणचित्रे:


Advertisements